वैयक्तिक शेत तळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बारामती, 16 डिसेंबरः मुख्यमंत्री शाश्र्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. बारामती कृषि उप विभागातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेत तळ्यासाठी महा-डीबीटी या संकेस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत बारामती तालुक्यात 73.60 लाख, दौंड- 38.23 लाख, इंदापूर- 65.85 लाख व पुरंदर-86.56 लाख असे एकूण 264.24 लाख लक्षांक प्राप्त झाले आहेत. शेततळे अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

निवडणुकांसंदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असावे. शेततळ्याची जमीन तांत्रिकृष्ट्या योग्य असावी. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळ्याच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. 5 टक्के दिव्यांग लाभार्थी उर्वरित पैकी 70 टक्के पुरूष व 30 टक्के महिला या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही तांबे यांनी केले आहे.

बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

One Comment on “वैयक्तिक शेत तळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *