बारामती, 20 डिसेंबरः जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ बारामतीतील सकल जैन समाजाच्या वतीने उद्या बुधवारी, 21 डिसेंबर 2022 रोजी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
मतदानाच्या हक्कासाठी खर्च केले तब्बल 80 हजार!
बंद दरम्यान दिवसभर बारामती शहरातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ बारामतीमधील सर्व जैन बांधव दिवसभर आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. बंदच्या दिवशी शहरातून बुधवारी सकाळी 10 वाजता मोर्चा निघणार आहे. त्यानंतर हा मोर्चा तीन हत्ती चौकातील श्री महावीर भवन येथून भिगवण चौक, गांधी चौक, गुणवडी चौकमार्गे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाणार आहे. त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
बारामतीत घरफोडी; साडेसात लाखांच्या ऐवजावर डल्ला
2 Comments on “बारामतीत उद्या बंदची हाक!”