बारामती, 31 जानेवारीः जानेवारी महिन्यामध्ये बारामती शहरातील कसबा भागामध्ये दिवसा घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे. याचाच गैरफायदा घेऊन फिर्यादी अश्विनी शिर्के (रा. बारामती) यांच्या शेजारी राहणारी संघर्षग्रस्त मुलीने दिवसा फिर्यादी घरातून कामानिमित्त कुटुंबीयांसह गेलेले असताना फ्लॅटच्या पाठीमागील बाजूने गॅलरीतून प्रवेश केला. तसेच फिर्यादीच्या घरात ठेवलेले सोन्या चांदीचे 2 लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
सातव- गुजर यांच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादीत बंडाळी; होळकरांची शिष्टाई
तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवल्यानंतर सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर घराच्या पुढील दरवाजा बंद होता. पाठीमागील गॅलरीचा दरवाजा ढकलला होते. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कौशल्याने तपास करून सदरची चोरी ही शेजारील विधी संघर्षग्रस्त बालिकेने केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. तपासात पोलिसांनी सदर बालिकेकडून 2 लाख रुपयांचे दागिने तिच्या मित्राकडे ठेवण्यास दिलेले जप्त केले.
मुर्टीमध्ये सुवासनी आणि विधवा महिलांचा हळदी कुंकू
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, सपोनि कुलदीप संकपाळ, पो. हवा. रामचंद शिंदे, पो. हवा. दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, पो. कॉ. तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अक्षय सीताप, सागर जामदार, शाहू राणे, चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी गोरे यांनी केलेली आहे.
One Comment on “विधी संघर्षग्रस्त बालिकेकडून घरफोडी उघड”