राज्यात शासकीय इमारती बांधण्यासाठी बारामती येथील इमारतींचा आधार घेण्यात येईल – देवेंद्र फडणवीस

बारामती, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे आज विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते. शासकीय कार्यालये चांगली असली पाहिजेत. तसेच अधिकाऱ्यांच्या मध्ये देखील लोकाभिमुखता असली पाहिजे. अशा कार्यालयात अधिकारी व कर्मचारी चांगले काम करून नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1763830926671241483?s=19

बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे उद्घाटन झाले!

“बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे असे आहे, तसेच येथील पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय, पोलिसांसाठी इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटत आहेत. अतिशय सुंदर इमारती झाल्या असून, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या वास्तूचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. राज्यात शासकीय इमारती बांधण्यासाठी या इमारतींचा आधार घेण्यात येईल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील विकासकामांचे कौतुक केले.

तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार

एकीकडे उद्योगांना मनुष्यबळाची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज लक्षात घेऊन नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन निर्णय घेण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तसेच त्यांच्या हाताला काम देण्याचा हा उपक्रम आहे. रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी चांगले काम करावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी युवक युवतींना दिला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्राचा नमो महारोजगार मेळावा बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात 55 हजारापेक्षा अधिक पदे अधिसूचित करण्यात आली असून 36 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्यापर्यंत आणखीन अर्ज येतील. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *