बारामतीत भावाची निर्घृण हत्या

बारामती, 30 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील माळेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. चप्पल व्यवसायासाठी दिलेल्या पैशाबाबत धाकट्या भावाने जाब विचारल्याने थोरल्या भावाने त्याला हाताने लाथाबुक्यानी मारहाण केली. यामुळे चिडलेल्या धाकट्या भावाने थोरल्यावर चाकूने वार करत त्याची निर्घृण हत्या केला आहे. कल्पेश धुळप (वय 26, रा. अमरसिन्ह कॉलनी, माळेगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ मंथन धुळप (वय 23) यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

बारामती नगर परिषदेच्या नुतन इमारतीचा कोसळला भाग?

दरम्यान, 28 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत आई सुरेखा धुळप यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या घरात ही घटना घडली. कल्पेश व मंथन ही फिर्यादीची मुले आहेत.

सार्थक फौंडेशनची 110 मुलांसोबत दिवाळी साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, शुक्रवारी मंथन याने मोठा भाऊ कल्पेश याला चप्पल व्यवसायासाठी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या 1 लाख 40 हजार रुपयांबद्दल विचारणा केली. त्यावर कल्पेश याने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याने आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत. मी नंतर पैसे देतो, असे सांगितले. त्यामुळे मंथन हा त्याच्यावर रागावला. या कारणावरुन कल्पेश याने त्याला हाताने बुक्यांनी मारहाण केली. ते सहन न झाल्याने मंथन याने घरातील कपाटातील चाकू काढून कल्पेश याच्या मानेवर, छातीवर वार करत त्याचा खून केला. पोलिसांनी तात्काळ मंथन यास अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बारामती उपकारागृहात त्याला नेण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

One Comment on “बारामतीत भावाची निर्घृण हत्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *