बारामती, 2 ऑगस्टः बारामती एमआयडीसी येथील रुई ग्रामीण परिसरात 1 ऑगस्ट 2022 रोजी भरदिवसा एकाचा खून झाल्याने खळबळ उडाली.गजानन पवार (मूळ रा. वसमत जि. हिंगोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तीचा खून हा त्याच्याच सख्ख्या मावस भावनाने केल्याचे माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस स्टेशनने घटना स्थळी धाव घेतली. तसेच बारामती तालुका पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे काही तासाच आरोपीला अटक करण्यात यश आले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसीत रुई परिसरात गजानन पवार यांचे केश कर्तनालयाचे दुकान आहे. या दुकानात गजानन पवार यांचा सख्खा मावस भाऊ संतोष गुळमुळे (रा. वसमत, जि. हिंगोली) काम करत होता. मात्र संतोष याला दारूचे व्यसन लागले होते. यामुळे तो सतत दारूच्या नशेत राहत होता. यामुळे गजान पवार हे संतोषला दारूच्या नशेत का राहतो, असे वारंवार विचारणा करत असत. याच गोष्टीचा राग मनात धरून 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास संतोष गुळमुळे याने गजानन पवार याच्यावर धारदार शस्त्राने 38 वार करत तेथून पसार झाला. गजानन पवार यांचा मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्याने हंबरडा फोडला. यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले.
बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
सदर घटनेची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या नेतृत्वात एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ढवाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दिली. तसेच महेश ढवाण यांनी तपास यंत्रणा वेगाने फिरवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजवरून सदर खून हा संतोष गुळगुळे यानेच केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले.
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या नेतृत्वात 20 कर्मचाऱ्यांनी परिसरात तातडीने शोध मोहीम सुरु केली. शोध मोहिमेत फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित आरोपी संतोष गुळगुळे याला पोलिसांनी कटफळ रेल्वे स्टेशनवर अटक केली. सदर खूनाची कबुली संशयित आरोपी संतोष गुळगुळे याने दिली. दारूच्या नशेत नेहमी राहतो, अशी विचारणा केल्याचा राग धरून आपण खून केल्याचे संशयित आरोपी संतोषने पोलिसांना सांगितले. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच आरोपी अटक करण्यात यश आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. सदर प्रकरणात अधिक तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.