बानपच्या भंगार चोरीच गोलमाल?

बारामती, 25 फेब्रुवारीः बारामती नगरपरिषद मालकीचे भंगार साठवण गोडाऊनमधून भंगार चोरीला गेल्याची जोरदार चर्चा बानप कामगारांमध्ये आहे. सदरची चोरी गोडाऊन कीपरचे सर्वेसर्वा व ज्याच्याकडे गोडाऊनची चावी असते, अशा उच्च पदस्थ असणाऱ्यांनीच चोरी केल्याचे बोलले जात आहे.

बारामतीमध्ये विकास कामे होत असताना गणेश मार्केट, पाणी साठवण तलाव, तीन हत्ती चौकातील पाण्याची टाकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, अतिक्रमण विभागाने काढलेले बोर्ड फ्लेक्सचे भंगार, स्ट्रीट लाईट खांब, वायर्स, पिण्याच्या पाण्याची लाईन पाईप, गुनवडी रोडवर तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या मंडईचे पत्रे आदी हे भंगार गोडाऊनला एकत्र करून ठेवले होते. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी माजी नगरसेवकाच्या मर्जीतील स्टोर कीपरकडे देण्यात असल्याचे समजते. त्याचे भंगार एनडीके एलएलपी कंपनीमधील सफाई ठेकेदार यांच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सदरचा माल लंपास केल्याचे समजते.

मयत कृष्णाच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे अभिजीत कांबळेंचे आश्वासन

त्यातच एका चोरीतील संबंधित व्यक्तीने थार कंपनीची चारचाकीची गाडी बुक केल्याचे समजते. तर एकाने भंगारच्या काळ्या बाजारातून मिळालेल्या पैशातून 7 तोळे सोन्याची चैन घेतल्याची चर्चा कामगारांमध्ये आहे. सदरचे भंगार नगर पालिकेच्या गाडीतून वाहतूक करून बेकायदेशीर धंदा करणाऱ्या भंगारवाल्यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. तर सदर चोरीचा माल बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावण्यात काही प्रतिष्ठित नगर पालिकेचे अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.

गोडाऊनला सक्षम भेट दिली असता, गोडाऊन कर्मचारी यांनी माल गेल्याचे कबूल दिली आहे. परंतु माल कोणी नेला आणि का नेला त्याच्याबाबत गुप्तता पाळली जात आहे. प्लास्टिक बंदीविरोधात बारामती नगर परिषदेने साडेतीन लाख रुपये किमतीच्या असणारे प्लास्टिक गोडाऊनमध्ये आढळत नसून त्याचीही विल्हेवाट कोणी लावली समजत नाही?

बारामती उपविभागात तब्बल 107 प्रकल्प मंजूर

याबाबत बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याबरोबर विचारणा केली असता तक्रारीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही, संस्थेचे हितांसमोर कोणीही दोषी असला तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करताना हायगय केली जाणार नाही, असा अभिप्राय ‘भारतीय नायक’शी बोलताना महेश रोकडे यांनी व्यक्त केला.

3 Comments on “बानपच्या भंगार चोरीच गोलमाल?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *