बारामती, 21 ऑक्टोबरः बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील हांबीर बोळ येथील सार्वजनिक शौचालयाची अज्ञातांकडून तोडफोड केल्याची घटना 19 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
सुप्रिया सुळेंचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल!
बारामती नगर परिषदेचा प्रभारी मुकादम कुणाल लालबिगे हे सदर ठिकाणी 19 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी स्वच्छतेची पाहणी करीता गेले असता ही घटना उघडकीस आली. सदर तोडफोडीत शौचालयातील पीओपी, 3 दार, 4 नळ, 4 एकजोस फॅन, पाणी मोटर स्टाटर, बल्ब वायरिंग आदींचे अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. तसेच शौचालयात बसविलेले डस्टबीन देखील काढून नेले.
हांबीर बोळ येथील शौचालयात घडलेल्या तोडफोडी विरोधात बानपचे प्रशासक तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सदर तक्रारीवरून बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
One Comment on “बानपच्या सार्वजनिक शौचालयाची तोडफोड”