बारामती, 29 ऑगस्टः चिकुनगुण्या, डेंग्यू, आणि H1N1 (स्वाईन फ्लू) आदी रोगांनी डोके वर काढले आहे. या रोगांचा प्रसार हा दुषित डास चावल्यामुळे होतो. हे डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. यामुळे बारामती नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात चिकुनगुण्या, डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या रोगांचा प्रसार रोकण्यासाठी आठवड्यातील गुरुवार हा एक दिवस संपूर्ण कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन बारामती नगर परिषदेने नागरिकांना केले आहे.
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
हा कोरडा दिवस पाळताना पाणी साठा करणाऱ्या टाक्या धुवून घेतल्यानंतर पाणीसाठा करावा, शहरात दैनंदिन पाणीपुरवठा होत असल्याने दोन दिवसापेक्षा जास्तीचा पाणीसाठा करू नये, तसेच ज्यांच्या मालकीचे मोकळे प्लॉट असून त्यावर गवत वाढलेले आहेत, ते तात्काळ काढून घेऊन नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नागरिकांना केले आहे.