बारामती, 10 एप्रिलः बारामती शहरातील विविध भागात नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वच्छ पाण्याचा पाणी पुरवठा केला जातो. या मोबदल्यात नगरपरिषदेकडून संबंधित नळ कनेक्शन धारकाकडून पाणीपट्टीच्या स्वरुपात पैसे घेतले जाते. जर वेळेवर पैसे भरले गेले नाहीतर लगेच पाणीपुरवठा विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येते. मात्र जर एखाद्यावेळेस पाणी पुरवठा विभागाकडून दुषित पाणीपुरवठा होत असेल आणि ते पाणी पिल्याने अनेकजण आजारी पडले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
बारामती शहरातील लक्ष्मीनारायण नगरमधील नळ कनेक्शन धारकांना गेल्या काही दिवसांपासून दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. पिण्याचा पाण्याला पूर्णपणे गटाराचे पाण्यासारखा वास येत असल्याची तक्रार संबंधित नळ कनेक्शन धारकांकडून होत आहे. या संबंधीची तक्रार बानपच्या पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख सचिन खोरे यांच्याकडे देऊनसुद्धा ‘परिस्थिती जैसे थे’ सारखीच असल्याची ओरड स्थानिकांमधून होत आहे.
सदरचे दुषित पाणी पिल्यामुळे अनेक लोक आजारी पडू लागली आहे. काही लोकांना काविळ सुद्धा झाली आहे. या परिस्थितीत पाणीपुरवठा विभाग प्रमुख सचिन खोरे हे या परिस्थितीत लक्ष देणार की लोकांना मरण्यासाठी सोडणार आहे, हे येत्या काही दिवसात दिसणार आहे.
तसेच दूषित पाण्याचे नमुने घेऊन कोणकोणती पायप लाईन लिक असेल, ती तातडीने दुरुतीबाबत आदेश काढून दूषित पाणी पुरवठा थांबविण्याची मागणी होत आहे.
One Comment on “बानपचा बेजबाबदारपणा; लक्ष्मीनारायण नगरला दुषित पाण्याचा पाणीपुरवठा”