बानपचा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला मागे

बारामती, 21 सप्टेंबरः बारामती नगर परिषदेने 19 सप्टेंबर 2022 रोजी शहरातील विविध भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल, असे जाहीर केले होते. निरा डावा कालव्यामधील प्रवाह बंद झाल्याने तसेच उपलब्ध पाण्याचा साठा असल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जाणार असल्याचे बानपने जाहीर केले होते. मात्र 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9 च्या सुमारास शहराला होणारा एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता दररोज पाणी पुरवठा होणार असल्याचे निवेदन बारामती नगर परिषदेच्या सोशल मीडिया फेसबुक पेजवरून जाहीर करण्यात आले आहे.

बारामती शहराला दिवसाआड होणार पाणी पुरवठा

सध्या बारामतीत डेंग्यू आणि चिकनगुनिया आदी रोगांनी डोके वर काढले आहे. यामुळे बानप ने शहरात कोरडा दिवस पाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या कचरा गाडीद्वारे वाजणाऱ्या दवंडीतून नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. अशातच एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याने ऐनवेळी बारामतीकरांची बानपने इकडे आड तिकडे विहिर अशी गत केली होती. मात्र ऐनवेळी शहरास होणाऱ्या एक दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या नियोजन बारामती नगर परिषदेकडून स्थगित करण्यात आले आहे.

माळेगाव नगर पंचायतीचा 135 कोटींचा विकास आराखडा मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *