बारामतीकरांना होम कंपोस्टिंग करण्यास नगरपरिषदेकडून प्रोहत्सान

बारामती, 24 मार्चः महाराष्ट्र – स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियान 3 उपक्रमांतर्गत, बारामती नगरपरिषदेने नुकतीच होम कंपोस्टिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत स्वावलंबी आणि शाश्वत समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. होम कंपोस्टिंगचे महत्त्व आणि घरातील किंवा समुदाय स्तरावर ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल समाजाला शिक्षित करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

या कार्यशाळेमध्ये कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विवेक भोईटे सरांनी उपस्थितांना होम कंपोस्टिंग बाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कंपोस्टिंग भांडे कसे निवडायचे, होम कंपोस्टिंगचे प्रकार, कंपोस्टिंग करताना येणारी आव्हाने आणि होम कंपोस्टिंगचे महत्त्व त्यामुळे होणारे फायदे तसेच आर्थिक उत्पन्न याबाबत माहितीही देण्यात आली.

अवैध धंदे बंद करण्यासाठी बारामतीत धरणे आंदोलन

बारामती नगरपरिषद बँक ऑफ बरोडा च्या सहकार्याने शहरातील होम कंपोस्टिंगचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसात शहरातील 600 बारामतीकर कुटुंबाकडून कंपोस्टिंग सुरू करण्याचा मानस आहे व तसे नियोजन केले आहे.

या प्रसंगी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की, “होम कंपोस्टिंग हा कचऱ्याचे घरगुती किंवा सामुदायिक स्तरावर व्यवस्थापन करण्याचा एक सोपा, परंतु प्रभावी मार्ग आहे. यामुळे केवळ कचरा कमी करण्यातच मदत होत नाही, तर परस बाग, टेरेस गार्डन आणि शेतांसाठी पोषक तत्वांनी युक्त कंपोस्ट तयार होते. तसेच होम कंपोस्टिंग हे त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

पैसे दुप्पट करतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

होम कंपोस्टिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती नगरपरिषदेचा प्रयत्न हा स्वावलंबी आणि शाश्वत समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने एक स्तुत्य उपक्रम आहे. परिषदेच्या प्रयत्नांमुळे केवळ कचरा कमीच होणार नाही, तर आरोग्यदायी आणि हरित पर्यावरणाला चालना मिळेल.

यावेळी आदित्य बनकर यांच्यासह स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सोनवणे, स्वच्छता निरीक्षक अजय लालबिगे, कुणाल लालबिगे, अश्विनी अडसूळ मॅडम, संतोष तोडकर आणि आरती पवार मॅडम उपस्थित होते. सोशल लॅब एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्सचे प्रतिनिधी देखील कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यशाळेतील त्यांच्या सहभागामुळे शाश्वत कचरा व्यवस्थापन पद्धतींवर मौल्यवान मार्गदर्शन मिळाले, ज्यामुळे उपस्थितांसाठी कंपोस्टिंगचा अनुभव अधिक समृद्ध झाला.

One Comment on “बारामतीकरांना होम कंपोस्टिंग करण्यास नगरपरिषदेकडून प्रोहत्सान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *