बानप उपकर कल्याण निधीचा ठेकेदारांवर उपकार

बारामती, 9 ऑगस्टः बारामती नगर परिषद हद्दीतील होत असलेल्या अनेक विकास कामांमध्ये बारामती नगर परिषद कर निरीक्षण अधिकार कामगार उपकर कल्याण निधी ठेकेदार भरत नाही. सदर गंभीर बाब माहिती अधिकारातून निर्देशनास आली आहे. बारामती नगर परिषद हद्दीत पंचायत समिती, पोलीस वसाहत, पोलीस मुख्यालय अशी अनेक कोट्यवधी रुपयांची कामे सध्या सुरु आहेत. या कामातील ठेकेदारांनी बारामती नगर परिषदेला कामगार उपकर कल्याण निधी भरत नसल्याचे उघडकीस आले आहे.

दौंड तालुक्यातून भेसळयुक्त गूळ आणि साखर जप्त

सदर माहिती अधिकारातून रिपब्लिकन पार्टी (आ) चे शहराध्यक्ष अभिजित कांबळे यांना सदर गंभीर बाब निदर्शनास आणली आहे. केंद्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून समोर येत आहे. मात्र या संदर्भात कर निरीक्षणक अनभिज्ञ असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात कर निरीक्षक अधिकाऱ्यास विचारले असता, ठेकेदारच्या बिलातून हा कर वसूल केला जातो, अशी खोटी माहिती दिली जात आहे.


दरम्यान, बारामती पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला 2014 मध्ये सुरुवात झाली तर सदर काम 2021 मध्ये पूर्ण झाले. मात्र 2022 संपत आला तरी सुद्धा कामगार कल्याण उपकर भरला नाही, असे समजते. तरीसुद्धा बारामती नगर परिषदेने या नवीन प्रशासकीय इमारतीत अनेक नियम बाह्य कामांना पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. या विरोधात आरपीआय (आ)चे बारामती शहराध्यक्ष अभिजित कांबळे यांनी केंद्र सरकारच्या कामगार कल्याण विभागास तक्रार केली असून चौकशीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *