भारतीय नायक दणका! बानप भंगार प्रकरण चौकशी समिती नियुक्त

बारामती, 4 मार्चः ‘बारामती नगर परिषदेच्या भंगार चोरीचा गोलमाल’ या शीर्षक खाली ‘भारतीय नायक’ ने भंगारमध्ये झालेला गैर व्यवहार प्रसिद्ध केले होते. या प्रकाराची बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी तीव्र दख्खल घेतली असून चंदन लालबिगे या कर्मचाऱ्यांची खाते अंतर्गत बदली केली आहे. तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांची चार सदस्यांची चौकशी समिती निर्माण केली आहे.

मुर्टी गावात अटल भूजल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण संपन्न

सदर समितीमध्ये बारामतीच्या उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईगडे, आस्थापना विभागाचे प्रमुख संतोष तोडकर, लेखा विभागाचे बाळासाहेब दूधभाते व पुरवठा विभागाचे प्रमुख स्नेहल घाडगे या कार्यक्षम अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सदर समितीत नियुक्ती केली आहे. सदर समितीने गणेश मार्केटचे भंगार, साठवण तलावाचे भंगार, तीन हत्ती चौकाजवळील पाण्याच्या टाकी खालील भंगार, विद्युत विभागाचे भंगार, आंबेडकर वसाहतीचे भंगार, नव्याने बांधलेली तात्पुरती मंडईचे भंगार, अतिक्रमण विभागाने जप्त केलेले प्लॅस्टिकचे भंगार तसेच मटेरियल फलेक्सचे भंगार असे सर्व प्रकारच्या भंगाराची चौकशी करणार आहे.

बारामतीत दिवसाढवळ्या महिलेवर बलात्कार; आरोपी मोकाट

या प्रकरणामुळे शहरासह जिल्ह्यात बारामती नगरपरिषदेची बदनामी होत आहे. तसेच बारामती नगर परिषदेच्या कारभाराबद्दल जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल, असे मतदारांमध्ये चर्चा होत आहे.

One Comment on “भारतीय नायक दणका! बानप भंगार प्रकरण चौकशी समिती नियुक्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *