जळोचीमध्ये रक्तगट तपासणी शिबीर संपन्न; 115 जणांची तपासणी

बारामती, 11 सप्टेंबरः बारामतीच्या क्षेत्रिय कार्यालय जळोची येथे गणेशोत्सवानिमित्त रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तगट तपासणी शिबीर प्रेरित फाउंडेशन आणि श्री संत सावता माळी तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आले.

बोरकरवाडी येथील तलाव भरला 100 टक्के

सदर रक्तगट तपासणी शिबिरात तब्बल 115 जणांनी तपासणी केली. या पुढेही रक्तगट तपासणी अभियान चालूच ठेवण्यात येणार आहे, असे प्रेरित फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर जमदाडे यांनी माहिती दिली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महेश साळुंके, डॉ. संतोष शिंदे, डॉ. गीतांजली शिंदे, निखिल होले, पांडुरंग कुदळे, विजय जमदाडे, दादासाहेब दांगडे, विजय फरांदे, धनंजय जमदाडे, नवनाथ जमदाडे, श्रीरंग जमदाडे, आदित्य जमदाडे, आकाश जमदाडे, तुषार जमदाडे, भाऊ बनकर, संदीप कुदळे आदींनी मेहनत घेतली. रक्तगट तपासणी शिबिराकरिता अष्टविनायक लॅबरोटरीचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *