बारामतीच्या जळोचीमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 21 ऑगस्टः बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील जळोची भागात आज, 21 ऑगस्ट रोजी, अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर हे जळोची येथील महाकाळेश्वर मंदिरात पार पडले.

बारामती प्रशासकीय कार्यालयाला भ्रष्ट अधिकाऱ्यांची वाळवी?

दरम्यान, हे रक्तदान शिबीर सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत पार पडले. सदर रक्तदान शिबीर हे नवनिर्माण युवा फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. बारामती सह परिसरात सदर दोन्ही संस्था समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी घेत असतात. तसेच येथून पुढे देखील असेच समाज उपयोगी काम करण्यात येतील, असे आश्वासन नवनिर्माण युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर यांनी दिले.

रक्तदान शिबिराचे आयोजन नवनिर्माण संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच करण्यात आले होते. या शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अजय दरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या शिबिरात प्रमुख पाहुणे डॉ. विश्वनाथ नरूटे, दीपक मलगुंडे, किशोर माशाळ, प्रताप पागळे, शैलेश बगाडे, डॉ. राजेंद्र चोपडे, बापुराव सोलनकर, मनोज बालगुडे, भीवा बालगुडे, धनंजय जमदाडे, माणिक मलगुंडे, दादा देवकाते, अ‍ॅड. अजित बनसोडे, अ‍ॅड. किरण सोनवणे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. सदर शिबिरासाठी डॉ. नवनाथ मलगुंडे, निखिल दांगडे, किशोर सातकर, रमेश मासाळ, अनिल गायकवाड, पत्रकार अजिंक्य सातकर, निलेश कांबळे यासह रोटरी क्लबचे हनुमंतराव पाटील, रविकिरण खारतोडे आदींनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *