विद्या प्रतिष्ठानमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 4 फेब्रुवारीः बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 2 फेब्रुवारी 2023 रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस बिचकर, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, वसंतराव पवार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल शहाणे तसेच बारामतीचे विद्यमान नगरसेवक जय पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपस्थितीत मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून रक्तदानाचे महत्व व त्याची समाजासाठीअसणारी गरज पटवून दिली.

हातगाडी धारकांना नगरपरिषदेचे आवाहन

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी सामाजिक जाणीव ठेवून रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत, ही समाधानकारक गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. या शिबिरामध्ये विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 152 रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये एकूण 152 रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. उमेश जगदाळे, प्रा. विकास बनसोडे तसेच विद्यार्थी सागर शेंडगे, स्वप्नील झारगड, निखिल भोंग, अभिषेक खामकर व त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी मित्र तसेच मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी विशेष सहकार्य केले.

ग्रामीण क्षेत्रीय कार्यालयात नागरी सुविधा केंद्र सुरू

या कार्यक्रमासाठी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. सुधीर लांडे, डॉ. बाळासाहेब पाटील प्रा. रोहित तरडे, प्रसारमाध्यम विभागाचे समन्वयक सुनिल भोसले हे सर्वजण आवर्जून उपस्थित होते. यासंपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

One Comment on “विद्या प्रतिष्ठानमध्ये रक्तदान शिबीर संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *