उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत रक्तदान शिबीर

बारामती, 26 जुलैः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत 25 जुलै रोजी विविध कार्यक्रम पार पडले. बारामती शहरातील भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम हा भारतीय जनता युवा मोर्चा पुणे च्या वतीने घेण्यात आला. रक्तदान शिबिरात 109 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रम भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला एक झाड भेट देण्यात आले.

पोलिसांच्या तत्परतेने वाचले एकाचे प्राण

सदर कार्यक्रम भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अजित मासाळ, बारामती युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम पंत थोरात, भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस प्रमोद साबळे, भाजप युवा वॉरियर्स तालुकाध्यक्ष संदीप केसकर यांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित मासाळ यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन कुल यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला व मोठ्या संख्येवर युवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *