बारामती, 26 मेः बारामती शहरात परप्रांतीय भंगार वाल्यांनी बेकायदेशीर चोरीच्या गाड्या भंगार म्हणून विघटन करून विकण्याचा सपाटा लावल्याची माहिती समोर येत आहे. सदर भंगार वाल्यांकडे भंगार साठवण्यास कुठलीही परवानगी नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
तसेच ज्वलनशीर भंगार गोळा करण्याची कुठलीही परवानगी नसताना सदर भंगार वाले अशा प्रकारचे भंगार बेकायदेशीररित्या गोळा करत आहेत. त्या भंगाराची धोकादायक पद्धतीने विल्हेवाट लावत आहे. मुळातच बारामती हद्दीच्या मध्यवर्ती असणाऱ्या एका भंगार गोडाऊनला ‘भारतीय नायक’च्या पत्रकारांनी भेट दिली असता अनेक क्रमांक असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहने तोडत असणारी वाहने निर्दशनास आली.
सदर भंगाराच्या गोडावनामध्ये अनेक स्फोटके उदारणार्थ सिलेंडर, एलपीजी सिलेंडर, सीएनजी सिलेंडर, केबल आदी पदार्थ निदर्शनास आली. त्यामुळे मुंबई, पुणे, बारामती या भंगारांच्या दुकानांना आग लावून अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जर एखादी आगीची दुर्घटना झालीच तर त्या वेळी आग नियंत्रणासाठी कुठलीही उपाययोजन नसल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसते. अशी गोडाउन चालतात तर कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.