बारामती, 4 फेब्रुवारीः बारामतीच्या विकास कामांमध्ये वृक्षतोडीचा काळा बाजार सध्या चालू आहे. बारामती शहरातील कॅनल लगतच्या विकास कामाला शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल केल्याचे निदर्शनास येत आहे. कुठलीही पूर्वपरवानगी प्राप्त झाले नसताना सदरचे वृक्षतोड केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या ताब्यात देऊन जमा करायचे असताना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनताने विल्हेवाट लावली जात आहे. तोडलेल्या वृक्षांचे पंचनामे केले जात नाही. तसेच वृक्षतोडीचा ठेका काढल्याशिवाय वृक्षतोडीचे ठेके दिले जात आहे. अल्पवृक्षाच्या तोडीच्या परवानगीच्या मोबदल्यात असंख्य वृक्ष तोडले जात आहे.
टकारी समाज हा पारधी जातीची पोट जात?
ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कामाचे उदाहरण म्हणून बारामती नगरपरिषद हद्दीमधील निरा डावा कालवा लगत वीर सावरकर तलावा शेजारी 13 निलगिरीच्या झाडांची तोडण्यासाठी परवानगी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेंद्र बोरकर यांनी मागितले असता, सदर परवानगी नगरपालिका यांनी आज 4 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत परवानगी दिली नाही. तसेच असतानाही वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्ष पंचनामे झाले नाही, तसेच तोडलेली वृक्ष पाटबंधारे विभागाकडे जमा केलेली नसल्याची समजते.
मतदानाविषयी जनजागृती करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन
One Comment on “बारामतीत वृक्षतोडीचा काळाबाजार?”