भाजपाची वरात आरपीआयच्या दारात!

बारामती, 3 ऑक्टोबरः बारामती शहरामधील कसबा येथील पंचशिल नगर येथे शुक्रवारी, 29 सप्टेंबर 2023 रोजी लाभार्थी वस्ती संपर्क अभियानाची प्रारंभ सभा पार पडली. या सभेचे आयोजन आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले होते. परंतु या कार्यक्रमाचे श्रेय भाजपाने पदरात पाडून घेतले. ऐनवेळी, व्यासपीठावर भाजपाचे नेते मंडळी आणि बॅनरवर भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासूदेव काळे यांचे फोटो लावले होते. हे सर्व पाहून आरपीआयचे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ व ओंकारभैय्या जाधव मित्र परिवाराकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

सदर कार्यक्रम तेथील समाज मंदीर असतानाही, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे पुजन केले नाही. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमानंतर गोंधळ घातला. सदर कार्यक्रमाच्या बॅनरवर आरपीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा फोटो तर सोडाच, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा फोटो देखील लावला गेला नाही. यासह आरपीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना देखील भाजपकडून सदर कार्यक्रमात मानसन्मान देण्यात आला नाही. दुसऱ्याच्या मंडपात आपलं लग्न उरकाचं, असाच प्रकार भाजपकडून सदर कार्यक्रमात झाल्याचे निदर्शनात आले. तसेच या कार्यक्रमाबद्दल स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनाही या सर्व प्रकाराबाबत साधी कल्पनाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरपीआयच्या कार्यक्रमात भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासूदेव काळे यांनी आपला कार्यक्रम उरकून घेतला, असा आरोप आरपीआय कार्यकर्त्यांसह भाजपचेच स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

बारामतीकरांनी पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करून घातला पर्यावरण रक्षणाचा आदर्श!

दुसरीकडे आरपीआयचा कार्यक्रम भाजपने विकत घेतल्याचा आरोप आरपीआय (आ) बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी केला आहे. अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन न करता स्वतःच्या स्वार्थासाठी लाभार्थी वस्ती संपर्क अभियान या कार्यक्रमाच्या नावाखाली आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्याचे स्थानिक लोकांकडून व्यक्त होत आहे.

One Comment on “भाजपाची वरात आरपीआयच्या दारात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *