मुंबई, 29 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 25 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. याच्याआधी भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. यामध्ये त्यांनी पहिल्या यादीत 99 उमेदवार आणि दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत एकूण 146 उमेदवार दिले आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (दि.29) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपची ही शेवटची उमेदवारांची यादी असण्याची शक्यता आहे. परंतु, याविषयी अद्याप काही सांगण्यात आले नाही.
भाजपच्या उमेदवारांची तिसरी यादी
1) मुर्तिजापूर – हरीश पिंपळे
2) कारंजा – सई डहाके
3) तिवसा – राजेश वानखेडे
4) मोर्शी – उमेश यावलकर
5) आर्वी – सुमित वानखेडे
6) काटोल – चरणसिंग ठाकूर
7) सावनेर – आशिष देशमुख
8) नागपूर मध्य – प्रवीण दटके
9) नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
10) नागपूर उत्तर – मिलिंद माने
11) साकोली – अविनाश ब्राह्मणकर
12) चंद्रपूर – किशोर जोरगेवार
13) आर्णी – राजू तोडसाम
14) उमरखेड – किशन वानखेडे
15) देगलूर – जितेश अंतापूरकर
16) डहाणू – विनोद मेढा
17) वसई – स्नेहा दुबे
18) बोरीवली – संजय उपाध्याय
19) वर्सोवा – भारती लव्हेकर
20) घाटकोपर पूर्व – पराग शाह
21) आष्टी – सुरेश धस
22) लातूर शहर -अर्चना चाकूरकर
23) माळशिरस – राम सातपुते
24) कराड उत्तर – मनोज घोरपडे
25) पलुस कडेगाव – संग्राम देशमुख