सामुहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे बारामती शहर पोलीस स्टेशनला निवेदन

बारामती, 25 ऑगस्टः इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावात एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी सामुहिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून सदर खटला फास्टट्रकवर चालविण्यात यावा, तसेच सदर पीडित मुलाला आर्थिक मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशनला 24 ऑगस्ट 2022 रोजी देण्यात आले.

अस्तरीकरणासाठी बारामतीचे शेतकरी आक्रमक

सदर घटनेचा भाजपकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरणातील फरारी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि हे प्रकरण पॉस्को अंतर्गत फास्टट्रक वर चालवून पीडितेला न्याय द्यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात भाजपकडून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी भाजप अनु.जाती मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस साजन अडसुळ, भाजप पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड, भाजप अनु.जाती मोर्चा बारामती शहराध्यक्ष चैतन्य गालिंदे, भाजप अनु,जाती मोर्चा शहर संघटन सरचिटणीस शैलेश खरात, अनु,जाती मोर्चा शहर सचिव निलेश त्रिमखे, अनु. जाती मोर्चा जिल्हा सोशल मीडिया संयोजक सचिन मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *