बारामती, 6 जुलैः बारामती शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आज, 6 ऑगस्ट 2022 रोजी भाजप अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठक ही महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जातीचे चिटणीस यशपाल (बंटी) भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत ‘हर घर तिरंगा अभियान’, ‘तिरंगा रैली’ आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली.
बारामतीत खाजगी विक्रेत्यांद्वारे तिरंगा ध्वजाची विक्री
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा मतदार संघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण या बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या विधानसभा मतदार संघातील कार्याकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. यामुळे भाजपने थेट राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 18 ऑगस्ट 2022 रोजी बारामती दौऱ्यावर येत आहे. या अनुशंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीनंतर भाजप संपर्क कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. सदर बैठकीस यशपाल (बंटी) भोसले, मयुर कांबळे, अक्षय गायकवाड, साजन अडसूळ, चैतन्य गालिंदे, रवि साळवे, उत्तम कांबळे, संजय दराडे, शैलेश खरात, निलेश रणदिवे, सचिन मोरे, रघु चौधर आदी पदाधिकारी उपस्थित होते.