राज्यात भाजपचा गुंडाराज सुरू आहे, सुप्रिया सुळे यांची उल्हासनगर गोळीबारावरून टीका

मुंबई, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) खासदार सुप्रिया सुळे यांनी उल्हासनगर गोळीबारावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. सुव्यवस्थेशी खेळ करण्याचा अधिकार गृहमंत्र्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिलाय का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1753659235169440238?s=19

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्री महोदयांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? पुण्यात भाजपाचे आमदार पोलीसांच्या श्रीमुखात भडकावितात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. हि या खोके सरकारची सत्ता आणि पैशांची मस्ती आहे. यांचा खेळ होतो पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मात्र हाल होतात. भरीत भर म्हणजे गोळीबार करणारे भाजपा आमदार ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यावर राज्यात गुंडगिरीच वाढणार’ असा थेट आरोप करतात.

महाराष्ट्र सरकार तात्काळ बरखास्त करा, सुप्रिया सुळेंची मागणी

“हा आरोप अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु आहे आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची गांभिर्याने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार तातडीने बरखास्त करायला हवे. शांतताप्रिय सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी गुंडगिरी खपवून घेता कामा नये,” अशा खासदार सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *