ग्रामपंचायत आणि पंचायत समितीविरोधात भाजपकडून उपोषणाचा इशारा

बारामती, 1 जूनः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संदिप गाडेकर हे 1 मे 2023 रोजी उपोषणाला बसले होते. सदर प्रकरणात 8 दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, असे लेखी आश्वासन बारामती पंचायत समितीने देत सदरचे उपोषण सोडवण्यात आले. मात्र चोपडज ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आढळूनही पंचायत समितीच्या बीडीओकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप संदिप गाडेकर यांच्याकडून होत आहे.

प्रशासनाकडून आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

सदर प्रकरणात पंचायत समितीकडून कारवाई न झाल्यास उद्या 2 जून 2023 पासून भाजपकडून चोपडज ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात तसेच पंचायत समितीकडून केलेल्या चौकशीत दोषी अढळूनही कारवाईत दुर्लक्ष केल्याविरोधात उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे पंचायतराज ग्रामविकास बारामती तालुका सहसंयोजक उमेश गायकवाड यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नेणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

सांगवीत फळे व भाजीपाला प्रक्रिया बाजार उप प्रकल्पाचे उद्घाटन

2 Comments on “ग्रामपंचायत आणि पंचायत समितीविरोधात भाजपकडून उपोषणाचा इशारा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *