बारामतीत भाजप सोशल मीडिया सेलची बैठक संपन्न

बारामती, 7 सप्टेंबरः बारामतीच्या एमआयडीसी येथील मुक्ताई लॉन्स येथे 6 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी पुणे ग्रामीण भाजप सोशल मीडिया सेलची संघटनात्मक आढावा बैठक झाली. पक्षाची भूमिका आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक बूथ, प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसे पोहचेल, याबाबत मार्गदर्शन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

बारामती नगर परिषदेच्या वाढीव हद्दीची समस्या ‘जैसे थे’च!

यावेळी भाजप सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे यांनीही भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बुथ पर्यंत सोशल मीडियाचे कसं काम करायचे, ते त्यांनी यावेळी समजून सांगितले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड, श्रीकांत थिटे, विनित वाजपेयी, साजन अडसूळ, शैलेश खरात, शरद भगत, मंदार कुलकर्णी, सचिन मोरे, बाळासाहेब बालगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *