बारामती, 13 डिसेंबरः बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या पाटीला आणि कार्यालयाच्या बोर्डला आज, 13 डिसेंबर 2022 रोजी सकाळीच्या सुमारास एका भिमसैनिकाने काळे फासले आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ त्या भिमसैनिकाने त्याच्या फेसबूक अकाउंटवरून पोस्ट करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.
चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त करताना?
भाजप कार्यालयाला काळे फासणाऱ्या भिमसैनिकाचे नाव सचिन जगताप आहे.’ आज दिवसाची सुरुवात बारामती बिजेपीच्या जनसंपर्क कार्यालयाला काळं पासून. जर आपण परिवर्तन करण्यासाठी दुसऱ्यांच्या कडून अपेक्षा केली तर परिवर्तन होणार नाही. त्या साठी आपल्याला स्वतःला पुढे येऊन प्रयत्न करावा लागेल. तरच परिवर्तन होईल.
चंदया पाटलाच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.
बघू जिथं उजडल….. तिथं उजडलं…..’
अशी पोस्ट करत सचिन जगतापने स्वतःच्या फेसबूक अकाउंटवरून काळे फासलेला व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच याचे राजकीय पडसाद देखील पडताना दिसत आहे.
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. तसेच चंद्रकांत पाटलांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाड आता पडताना दिसत आहे.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर पिंपरी चिंचवड येथील भाजपचे पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चंद्रकांत पाटील चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांच्यावर समता सैनिक दलातील एका भिमसैनिकाने शाई फेकली.
या घटनेप्रकरणी समता सैनिक दलाचे मनोज गरबडे, धनंजय इजगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय ओव्हाळ या तीन भिमसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित पवारांकडून पालकांना मार्गदर्शन
One Comment on “बारामतीमधील भाजप कार्यालयाला भिमसैनिकाने फासलं काळं!(व्हिडीओ)”