उत्तरप्रदेश, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडेः उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये एका भाजप आमदाराची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. नीरज बोरा असे या आमदारांचे नाव आहे. ते लखनौ उत्तर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. त्यांची काल (दि.19) अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यावेळी या हॅकर्सनी त्यांच्या वेबसाईटवर पाकिस्तानचा झेंडा लावला होता. तसेच त्यावर त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा लिहिला होता. एवढेच नाही तर, या हॅकर्सनी युपीचे मुख्यमंत्री योगींच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंटही केल्या होत्या.
या आत्महत्यांना केवळ सरकारच जबाबदार- जरांगे पाटील
त्यानंतर नीरज बोरा यांनी याबाबत सायबर पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या नीरज बोरा यांच्या या वेबसाईटच्या सुरक्षेचे काम सुरू आहे. तर याचा अधिक तपास सायबर पोलिस करीत आहेत.
टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिकच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट!
दरम्यान, हे हॅकिंगचे प्रकरण नवे नाही. याआधी ही अनेक नेत्यांची सोशल मीडिया अकाऊंटस् आणि वेबसाईट्स हॅक केल्या गेल्या आहेत. तत्पूर्वी आमदार डॉ नीरज बोरा यांनी भारत सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी Drneerajbora.in या नावाने वेबसाईट सुरू केली होती. तर अशाप्रकारे वेबसाईट हॅक करण्यात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
One Comment on “भाजप आमदाराची वेबसाईट हॅक! लावला पाकिस्तानचा झेंडा”