भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; कोणत्या आहेत घोषणा?

मुंबई, 10 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहिरनामा रविवारी (दि.10) प्रसिद्ध केला आहे. हा कार्यक्रम भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://x.com/BJP4Maharashtra/status/1855491491847885188?t=SX4DaA3WvrtGdY0EoXErXg&s=19

अनेक मोठ्या घोषणा

या जाहीरनाम्यात भाजपकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2,100 रुपये देणार, शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 15,000 रुपये मिळणार, एमएसपी वर 20 टक्के अनुदान देणार, वृद्धांना 2,100 रुपयांची पेन्शन, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर, 25 लाख रोजगार निर्मिती करणार, विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देणार, वीजबिलात कपात करणार, 50 लाख महिलांना लखपती दीदी बनविणार, गोरगरिबांना मोफत अन्नधान्य यांसारख्या अनेक घोषणा भाजपने या जाहीरनाम्यात केल्या आहेत.

भाजपचा संपूर्ण जाहीरनामा

1) लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 2,100 रुपये, म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये मिळणार.
2) शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी शेतकरी सन्मान निधीत वाढ 12,000 रुपयांऐवजी 15,000 रुपये मिळणार आणि एमएसपी वर 20 टक्के अनुदान देणार.
3) भाजप-महायुती कडून अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर मिळणार.
4) वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला 2,100 रुपये म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये मिळणार.
5) राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार.
6) 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देणार आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार.
7) ग्रामीण भागांतील 45,000 गावांत पांदण रस्त्यांची बांधणी करणार.
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार.
9) वीज बिलात 30% कपात करणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार.
10) सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र 2028’ सादर करणार.
11) महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य साकार करणार.
12) महाराष्ट्राला फिनटेक आणि AI ची राजधानी बनविणार आणि नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे एयरोस्पेस हब बनविणार.
13) शेतकऱ्यांना खतांवरील SGST कर परत मिळणार. सोयबिनला प्रति क्विंटल किमान 6,000 रुपये भाव देणार.
14) 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी 500 बनविणार बचतगटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध करून देणार.
15) अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य देणार.
16) महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार.
17) महाराष्ट्रात होणार कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार.
18) प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून 10 लाख उद्योजक घडवणार.
19) एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणार.
20) ओबीसी, एसबीसी, इडब्लुएस आणि वीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती करणार.
21) युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड देणार आणि वार्षिक आरोग्य तपासणी करणार.
22) महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणार.
23) ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार-सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी उपलब्ध करणार.
24) सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार फसव्या धर्मातराला आळा बसवणार.
25) आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार तसेच वन्य प्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *