बारामती, 3 जानेवारीः हिवाळी अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल एक विधान केलं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक आहे, असं विधान सभेत सांगितले. या विधानानंतर आता भाजपसह हिंदूवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
बारामती शहरातील भिगवण चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2 जानेवारी 2022 रोजी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधा निषेध आंदोलन केले. यावेळी भाजपच्या वतीने मोर्चा काढून शेवटी निषेध सभा पार पडली. या निषेध मोर्चात भाजपच्या मोठ्या नेत्यांनीही सहभाग नोंदविला.
बारामतीकरांना नगरपरिषदेचे आवाहन
यावेळी प्रदेश भाजपचे सरचिटणीस तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, धर्मेंद्र खांडरे, अविनाश बवरे, अविनाश मोटे, जालिंदर कामठे, दिलीप खैरे, अक्षय गायकवाड, गणेश जगताप, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, सुरेंद्र जेवरे, शहाजी कदम, राजेश कांबळे, ज्ञानेश्वर माने, रघु चौधरी, प्रमोद डिबळे, प्रमोद खरीडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामतीमधील संस्थांनी प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन
मात्र काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी येथील निवास स्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर पोलीस प्रशासनाने भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
One Comment on “अजित पवारांच्या विरोधात बारामतीत भाजप आक्रमक”