झाड लावून साजरा केला वाढदिवस!

बारामती/मोराळवाडीः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोराळवाडी येथे आज (दि. 09 ऑगस्ट) नागपंचमी निमित्त झाड लावून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. मोराळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास नवले व कार्यकर्ते सचिन कारंडे यांच्या प्रयत्नातून मोराळवाडी येथे ‘एक वाढदिवस एक झाड लावणे’ ही संकल्पना रुजविण्यात येत आहे. या संकल्पनेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त व युवा कार्यकर्ते रामदास नवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या संकल्पनेला सुरूवात करण्यात आली आहे.



त्यानुसार आजपासून येथून पुढे मोराळवाडी ग्रामपंचायतमध्ये ‘एक व्यक्तीचा वाढदिवस एक झाड लावणे’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला भाजप नेते बाळासाहेब बालगुडे, मूर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते हरी जगदाळे तसेच मोराळवाडी सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह युवा कार्यकर्ते सचिन कारंडे, उत्तम बंडगर, अक्षय गोपणे, सरपंच बापू गोफणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *