माळेगाव ताडी प्रकरणात मोठी अपडेट

बारामती, 1 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे विषारी ताडी प्यायल्याने दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला असून, इतर तीन जणांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे ताडी पिणारे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. दरम्यान, ताडी विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे माळेगावात तणावाची परिस्थिती असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

इंदापुरात रानगव्यांचं दर्शन?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव नगर पंचायतीच्या चंदननगर भागात भटक्या समाजाची मोठी लोकवस्ती आहे. या वस्तीतील ताडी पिणारे राजू गायकवाड (35), हनुमंता गायकवाड (40, दोघेही रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) या दोन सख्ख्या चुलत भावांचा 30 ऑक्टोबर 2022 रोजी मृत्यू झाला. यासह इतर ताडी पिणारे भैरू गायकवाड, भीमा गायकवाड, भीमा भोसले या तीन युवकांवर बारामतीमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयत राजू गायकवाड यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे. तर हनुमंता गायकवाड यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे.

बानप ठेकेदाराकडून अनुसूचित जातीच्या महिलांचा लैंगिक शोषण?

या घटनेबाबत अरुण भोसले (रा. चंदननगर, माळेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संदिप साठे, मोहन साठे, मोहनची पत्नी (सर्व रा विक्रमनगर, माळेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संदिप साठे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना दुर्दैवी असून घटनेतील आरोपींव कठोर कारवाई केली जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.

One Comment on “माळेगाव ताडी प्रकरणात मोठी अपडेट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *