गॅस सिलिंडर दरात मोठी कपात

मुंबई, 1 जुलैः व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात पेट्रोलियम कंपन्यांकडून आज, 1 जुलै पासून मोठी कपात केली आहे. आज पासून व्यावसायिक वापरातील 19 किलोचा गॅस सिलिंडर हा मुंबईत 190.50 रुपयांनी तर दिल्लीत 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती गॅसच्या किमतीत कोणतीच वाढ किंवा कपात करण्यात आलेली नाही.

दरम्यान, मुंबई व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर हा 2171.50 रुपयांना मिळत होता. आता तोच गॅस स्वस्त होऊन 1981 रुपयांना मिळत आहे. या गॅस कपातीचा फायदा छोट्या व्यावसायिकांना मिळणार आहे.

दत्तात्रेय भरणे यांना मातृशोक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *