न्यूयॉर्कमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

न्यूयॉर्क, 09 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना रविवारी रात्री 8 वाजल्यापासून न्यूयॉर्क मधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याची दोन्ही देशांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सामना झाला आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा पराभव केला होता. तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1799367771089678467?s=19

हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानसाठी हा सामना ‘करा किंवा मरो’ सारखाच असणार आहे. कारण, आजच्या सामन्यात पराभव झाल्यास पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 12 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 8 सामने जिंकले असून पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत. तर एक सामना टाय झाला. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ सहा वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यामधील केवळ एका सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

पाहा खेळपट्टी कशी आहे?

दरम्यान, आजचा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होतो. कारण या मैदानावर वेगवान गोलंदाजांचा चेंडू सुरुवातीला स्विंग होतो. त्यामुळे या सामन्यात धावा करताना फलंदाजांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन आज नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याची शक्यता आहे.

या चॅनलवर सामना दिसणार

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर करण्यात येणार आहे. सोबतच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होईल.

भारतीय संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान संघ:- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान खान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *