सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ

सोलापूर, 7 मेः देशभरात इंधन वाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल आता सीएनजी गॅस महागल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसत आहे. सोलापुरात मागील चार दिवसात सीएनजीचे दर तब्बल 16 रुपयांनी वाढले आहेत. चार दिवसापूर्वी सोलापूर सीएनजीचे दर 81 रुपये होते. तर ते दर आता 95. 59 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.

त्यामुळे सोलापूर शहरातील सीएनजी गॅसच्या प्रति किलोसाठी 95 रुपये मोजावे लागणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात धार्मिक स्थळे आहेत. यामुळे पंढरपूर, अक्कलकोट या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी भाविक सोलापुरात येत असतात. मात्र सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणीच सीएनजी गॅस पंपा उपलब्ध आहे. मात्र अचानकपणे वाढलेल्या सीएनजी गॅस दरामुळे वाहनचालकांची कंबरडे मोडल्याचे दिसत आहे.

सीएनजीचे दर कमी करण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत. गेल्या दोन महिन्यापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल 120.21 तर डिझेल 104.6 रुपये लिटर आहे. त्यामुळे अगोदरच महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *