आषाढी एकादस ही हिंदूंसाठी मोठी आहे. या दिवशी हिंदू बांधवांकडून एक दिवसाचा उपवास ठेवण्यात येतो. यामुळे या पवित्र दिवशी बकरीची कुर्बानी ने देता सामाजिक सलोखा ठेवत बारामतीसह राज्यभरातील मुस्लिम बांधवांकडून आज एकाही बकरीची कुर्बानी दिली गेली नाही. मात्र उद्या, 11 जुलै (सोमवारी) बारामतीत बकरीची कुर्बानी देऊन बकरी ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मोईन बागवान यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना दिली आहे.
मुस्लिम बांधवानी एकादशी दिवशी बकरीची कुर्बानी न करण्याच्या निर्णयाचे बारामतीतील हिंदू बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच या निमित्ताने पुन्हा एकदा बारामतीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण समोर आले आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधव सलमान बागवान, मोहसिन शेख आणि मोईन बागवान यांना हिंदू बांधवांकडून आज, सकाळी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक जगताप यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.