बिग ब्रेकिंग बारामतीत कुऱ्हाडीने सपासप वार करत एकाची हत्या!

बारामती, 18 ऑगस्टः बारामती येथील श्रीराम नगरमधील जिजाऊ कार्यालय शेजारी आज, 18 ऑगस्ट 2022 सायंकाळी सुमारास  एका व्यक्तीची कुऱ्हाडीने सपासप वार करत हत्या करण्यात आली आहे. वादाचे रुपांतर भांडणात होऊन एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले. सदर व्यक्तीला बारामतीमधील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले आहे.

राजीव गांधी जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती शहर पोलीस दाखल झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव शशिकांत बाबासाो कारांडे आहे. मृत व्यक्ती हा फलटण येथील रहिवासी आहे. सदर प्रकरणात पोलीस अधिका तपास करीत आहे. सदर घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरणा आहे. तसेच घटना स्थळी पोलीस दल देखील दाखल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *