अनाधिकृत प्लॉटिंगला मोठा दणका

दौंड, 24 सप्टेंबरः दौंड तालुक्‍यातील भांडगाव येथे शासनाची कसलीही परवानगी न घेता, अवैधरित्या गुंठेवारी करणाऱ्यांना दौंडच्या तहसिलदारांनी दणका दिला आहे. शर्त भंग केल्याप्रकरणी जमीन सरकार जमा का करण्यात येवू नये, याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करावा, अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल, अशी नोटीसच बजावली गेली आहे.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास बस चालू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील गट नं. 363 ही अरविंद गुलाबचंद सोलंकी यांच्या नावे आहे. या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. मात्र अवैधरित्या त्या जमिनीवर प्लॉटिंग करण्यात आली आहे. तसेच त्या प्लॉटिंगची जाहिरात करून विक्री करीत आहे. या जमिनीमध्ये मोठ्या उंचीची कमान व इतर स्वरूपाचे बांधकाम केलेले आहे. त्याचप्रमाणे उत्तरेस रस्ता ठेवलेला आहे. रस्त्याचे पशिमेस छोट्या मोठ्या आकाराचे प्लॉट पाडून विक्री करण्याची जाहिरात करीत आहे.

गटाच्या चारही बाजूंनी तारेचे संरक्षक कुंपण, काही जागेत भिंतीचे बांधकाम, गटात बनविलेल्या प्लॉटिंगसाठी रस्त्याचे कच्चा मुरूम टाकून बांधकाम केल्याचे दिसून आले. यामुळे भांडगावचे तलाठी अर्जुन स्वामी यांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करून तहसिलदारांना या बाबत अहवालात नमूद केले आहे.

संबंधित प्लॉटिंग धारकास नोटीस बजावली आहे, त्यांच्याजवळील कागदपत्राची तपासणी करून पुढील कारवाई करू, इतर ठिकाणच्या प्लॉटिंग संदर्भात तक्रारी आल्यासही कारवाई करू असे दौंडचे तहसिलदार संजय पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *