बारामती आगारातील 9 जणांवर मोठी कारवाई

बारामती, 5 नोव्हेंबरः राज्य परिवहन महामंडळाच्या बारामती आगारामधील 4 चालक, 4 वाहक आणि नियंत्रक अशा 9 जणांवर कामात कुचराई करण्याचा ठपका ठेवत प्रभारी आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी 2 नोव्हेंबर 2022 रोजी निलंबनाची कारवाई केली आहे. ठरलेल्या मार्गावर बस न नेता ती अर्ध्या रस्त्यातून परत आणल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. त्यासाठी जबाबदार धरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी काही महिलांनी पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याकडे मोबाईल वरून तक्रार दाखल केली होती.

फळबागासंदर्भात कृषि विभागाचे आवाहन

दरम्यान, 1 नोव्हेंबर 2022 रोजी बारामती ते नीरा या ठिकाणी जाणारी एसटी बस वडगाव निंबाळकर या बस स्थानकातूनच परत आणल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल 4 वाहक व 4 चालकांनी बारामती मधून निघाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथूनच या चार बसेस माघारी फिरवल्या. त्यामुळे वडगाव निंबाळकर येथून नीरा बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या बाबत तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई झाली.

बारामतीतील दोन सराईतांवर तडीपारची कारवाई

याबाबतच्या तक्रारी थेट रमाकांत गायकवाड यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अशाप्रकारे एसटीची पूर्ण फेरी न करता कोणालाही कल्पना न देता किंवा परवानगी न घेता अर्ध्या रस्त्यातून बस परत आणण्याचा प्रकार शिस्तभंगाचाच आहे. यामुळे याची दखल घेत निलंबनाची कारवाई केल्याचे रमाकांत गायकवाड यांनी सांगितले. बस रस्त्यातून परत आणल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याची ही अलीकडील काळात पहिलीच वेळ आहे. शिस्तभंगाचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रमाकांत गायकवाड यांनी याप्रकरणी दिला आहे.

One Comment on “बारामती आगारातील 9 जणांवर मोठी कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *