पुणे, 10 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज करण्यात आले. हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
आज पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस आणि श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित राहिलो. आजच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी… pic.twitter.com/ioBrGJ5HX8
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 10, 2024
या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण!
आज याठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. यामध्ये वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन, घोरपडी येथील पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण, घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वारजे येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच वारजे येथील नवीन डी.पी. रोडचे भूमिपूजन इत्यादी कामांचा समावेश होता.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1766684333606138194?s=19
या रुग्णालयात जागतिक दर्जाच्या सुविधा असतील: देवेंद्र फडणवीस
देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्यानं वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचे कार्यक्रम पार पाडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यासह सहभागी झालो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 10, 2024
कोविड… pic.twitter.com/bsveCkI8HT
गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन संवेदनशील: अजित पवार
कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला. गोरगरिबांच्या समस्या सोडवण्याबाबत शासन संवेदनशील असून, त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत. सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील 10 टक्के खाटा मोफत आणि 6 टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तम सुविधा असलेलं रुग्णालय नागरिकांसाठी उभे रहणार आहे. बाणेर येथे देखील 550 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. असे अजित पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.