वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

वढु बुद्रुक, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढु बुद्रुक येथे आज स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, महेश लांडगे, अशोक पवार, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

https://twitter.com/InfoDivPune/status/1763949238684357055?s=19

110 कोटी 76 लाख रुपयांची विकासकामे

यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. या समाधीस्थळी 110 कोटी 76 लाख रुपये खर्चून संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने, छत्रपती संभाजी महाराज यांचे 60 ते 65 फूट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, 250 मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची आणि साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

समाधीस्थळ उभारण्याची संधी मिळाली हे आपले भाग्यचं!

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास आपल्या हातून व्हावा, यासाठीच राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात यावे लागले. महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व हे अनन्यसाधारण असून त्यांच्या लौकिकाला साजेसे समाधीस्थळ उभारण्याची संधी आपल्याला मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच संभाजी महाराजांच्या कार्याचा यथार्थ गौरव करणारे स्मारक याठिकाणी उभारले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *