भिमनगर येथे जिमच्या दुमजली इमारतीचे भूमिपूजन; सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळे व दया दामोदरे यांच्या प्रयत्नांना यश

बारामती, 26 फेब्रुवारीः बारामती येथील आमराई परिसरातील भिमनगर येथे आज जिमच्या दुमजली इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन टेक्स टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनित्रा पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बारामती आरपीआय नेते अभिजित कांबळे यांच्या हस्ते सुनित्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, भिमनगर महिला समिती, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, मा नगरसेवक बिरजु मांढरे, मयुरी शिंदे, मा. उपनगर अध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मा नगरसेवक आप्पा अहिवळे, उत्तम धोत्रे, सतीश खुडे, संतोष वाघमारे, नितीन खरात, संतोष भोसले, दत्तात्रय रणदिवे, अनिकेत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



तत्पूर्वी, जिल्हा क्रिडा नियोजन समिती पुणे यांच्या मार्फत आमराई परिसरातील भिमनगर येथे जिमचे साहित्य माजी नगरसेवक मयुरी सुरज शिंदे व बिरजु मांढरे यांच्या मागणीनूसार, 2019 साली जिम साहित्य मिळाले होते. हे जिम साहित्य दुमजली आसणार्‍या भिमनगर समाज मंदिराच्या खालच्या बाजुस असणार्‍या हाॅलमध्ये बसवण्याचे ठरले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध करण्यात ज्यांची हयात गेली तो व्यक्ती जिम साहित्य फिटिगं करण्यास विरोध करू लागला. त्यामुळे माजी नगरसेवक बिरजु मांढरे व मयुरी शिंदे यांनी तसेच जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या प्रयत्नांनी भिमनगर मधील जिम साठी पर्यायी जागा ओपन कार्यक्रमासाठी असणारी जागा याठिकाणी पत्राशेड मंजुर करुन आणले.



दरम्यान, पत्राशेड म्हणजे दोन – तीन वर्षांनी गंज लागून खराब होणार हे लक्षात घेऊन, सामाजिक कार्यकर्ते बारामती आरपीआय पक्षाचे नेते अभिजित कांबळे व दया दामोदरे यांनी मुख्यधिकारी यांना पत्राशेडचे काम तात्काळ थांबविण्याची विनंती केली. तसेच त्यांनी या ठिकाणी पक्की व दिर्घकाळ टिकेल, ह्या हिशोबाने आरसीसी सिंमेट काँक्रीटची दुमजली व कालांतराने भविष्यात वाढ होईलअशी सभागृहची निर्मिती व्हावी, यासाठी विनंती केली. ते नगरसेवक अभिजीत जाधव यांनी ठराव करुन दिले. हे काम मंजुर करण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. त्यामुळे अंदाजे 78 लाख रुपयांच्या या दुमजली इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली. आज या दुमजली इमारतीच्या कामाचे भूमिपूजन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडले. लवकरच या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *