भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूचे बारामतीत आगमन

बारामती, 31 मेः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा इंदू मिल प्रणेते आनंदराज आंबेडकर यांचे आज, मंगळवारी (31 मे) बारामतीत आगमन होणार आहे. बारामतीमधील माता रमाई आंबेडकर भवनात आज दुपारी 4 वाजता महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडणार आहे. यात नुकतेच एमपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केलेल्या तरुणांसह इतर मान्यवरांचा सत्कार आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती
रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव प्रशांत सोनवणे आणि बारामती तालुका प्रसिद्धी प्रमुख आविनाश कांबळे यांनी दिली आहे.

दरम्यन, एमपीएससीचा नुकताच काही विभागांच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा शुभम शिंदे आणि सुरज मोरे यांनी पास करून उज्ज्वल यश संपादित केले आहे. तर नायब तहसिलदार पदाची परीक्षा प्रतीक आढाव आणि संकेत गायकवाड यांनी पास करत मोठे यश संपादित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *