BPL-4 चा भापकर 007 बनला नवा किंग!

बारामती, 28 नोव्हेंबरः बारामती प्रीमियर लीग-4 चा अत्यंत रोमहर्षक आणि उत्साहवर्धक असा अंतिम रंगतदार सामना भापकर 007 या संघाने जिंकला आहे. भापकर 007 च्या फटकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करणारा अष्टफैलू खेळाडू संतोष लष्कर याच्या अफलातून खेळीने भापकर 007 ने एकहाती वर्चस्व गाजवत BPL-4 चा नवा किंग बनला आहे.

रुद्र थंडर्सने नाणे फेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भापकर 007 या संघाला प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांमध्ये 3 विकेट गमावत तब्बल 115 धावा केल्या. या इनिंगमध्ये भापकर 007 च्या संतोष लष्करची तुफानी इनिंग पाहण्यास मिळाली. त्याने 20 चेंडूत तब्बल 77 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि तब्बल 11 षटकार मारल्या.

मात्र 115 धावांचा पाठलाग करताना रुद्र थंडर्सचीही ताबोडतोड फटकेबाजी पाहण्यास मिळाली. संतोष लष्करच्या भेदक गोलंदाजीमुळे रुद्र थंडर्सला 115 धावांचा पाठलाग करणं खूपच अवघड बनलं. रुद्र थंडर्सला 6 षटकांमध्ये 4 विकेट गमावत 83 धावांच बनता आल्या. यात संतोष लष्करने 28 धावा देत 2 बळी घेतल्या. या सामान्यात सर्वोत्तम खेळी केल्याबद्दल संतोष लष्कर याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केले. तसेच त्याला मॅन ऑफ द सिरीजनेही सन्मानित केले.

आमराई बॉईज आयोजित बारामती प्रीमियर लीगच्या 4 पर्वात भापकर 007 या संघाला प्रथम पारितोषित आणि 1 लाख 1 हजार 444 रुपये रोख देण्यात आले. तर रुद्रा थंडर्स या संघाला द्वितीय पारितोषित आणि 61 हजार 444 रुपये रोख देण्यात आले. शिवरत्न विनर्स संघाला तृतीय पारितोषित आणि 41 हजार 444 रुपये रोख तर केजीएफ किंग या संघाला चतुर्थ पारितोषित आणि 25 हजार 444 रुपये रोख देण्यात आले.

यंदाचा पहिला मानाचा बारामती भूषण पुरस्कार विजय (तात्या) नलवडे यांना देण्यात आला. तर बेस्ट बेट्समन चेतन काळंगे(शिवरत्न विनर्स), बेस्ट बोलर अभिजीत सुतार(केजीएफ किंग), बेस्ट कीपर भूषण जगताप(बीजे टायगर्स), तर बेस्ट फिल्डर सुरज जाधव(शिवशंभो स्मॅशर्स) यांना देण्यात आला. तसेच फास्टेस्ट 50- संतोष लष्कर(भापकर 007), गेम चेंजर- गणेश डेरे(शिवरत्न विनर्स), स्टाईलिश प्लेअर- सौरभ दळवी(मित्र प्रेम पँथर्स), 12th मॅन अ‍ॅवार्ड- करिम तांबोळी(ओम कसबा हिटर्स) या खेळांडूना देण्यात आला.

बारामतीत आढळली दुर्मिळ जातीची बिबट्यासदृश्य प्राण्याची पिल्ले

प्रथम पारितोषिक दुर्योधन भापकर यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक गणेश सोनवणे यांच्याकडून, तृतीय पारितोषिक सत्यवान काळे यांच्याकडून, चतुर्थ पारितोषिक प्रताप पागळे यांच्याकडून देण्यात आले. तर 1 ते 4 ट्रॉफी विश्वास देवकाते, सर्व वैयक्तिक बक्षिसांचे चषक प्रमोद जगताप, सर्व मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी चंद्रकांत माने आणि दयावान दामोदरे, सन्मानचिन्ह ट्रॉफ्री अभिजीत नलवडे आणि सिद्धार्थ पाटील यांच्याकडून देण्यात आले. तर किट सौजन्य अष्टविनायक मोबाईलचे विक्रांत सप्रे, इलाईट फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब, शिवदुर्ग व्हेज नॉनव्हेज, आकाश महाडिक, प्रताप पागळे, गायकवाड चहा, जोजारे सराफचे गणेश जोजारे, शेरसुहास मित्र मंडळचे अ‍ॅड. सुशिल अहिवळे, वाय ग्रुपचे यश खोत, राजमुद्रा हॉटेलचे प्रशांत शिंदे, अनुसया डेव्हलपर्सचे मयूर सातव, आर्शिवाद मच्छी अँड सी फुड्स, जय मल्हार विट सप्लायर्सचे रोहित मल्हारे, समृद्धी मेडिको अँड जनरल स्टोअर्सच्या राणी काळखैरे यांच्याकडून देण्यात आले. तसेच शूज सौजन्य- एमर्जिंग प्लेअर- दत्तात्रय सोनवणे, फास्टेस्ट 50 प्रणीव सातव, गेम चेंजर- अभिजीत काळे, स्टायलिश प्लेयर हेमंत गडकरी, 12th मॅन अ‍ॅवार्ड मिलिंद काटे, फिटनेस प्लेयर अ‍ॅवार्ड सागर रोहानी, सिक्सर किंग शुभम कांबळे, मोस्ट एक्सपरियन्स अ‍ॅवार्ड वेलकम स्पोर्ट्स शॉप, मॅन ऑफ द सिरीज जयसिंग देशमुख, बेस्ट बॅट्समन विजेंद्र काळे, बेस्ट बॉलर समीर मुलानी, बेस्ट फिल्डर साहिल चव्हाण, बेस्ट किपर गणेश डेरे यांच्याकडून देण्यात आला.

सदर BPL 4 स्पर्धेचे आयोजन अभिजीत कांबळे, योगेश व्हटकर, रविंद्र(पप्पू) सोनवणे, सुरज(पप्पू) अहिवळे यांनी केले. तर स्पर्धा यशस्व करण्यासाठी विजय नलवडे, अभिजीत काशीद, अभिजीत नलवडे, भिमरत्न भोसले, शुभम चव्हाण, सुरज विश्वकर्मा, सोहेल शेख, सुजित बगाडे, अविनाश कांबळे, शुभम कांबळे, सुशिल कांबळे, अनिकेत कांबळे, सनी गायकवाड, गणेश जाधव, गणेश धोत्रे, अमोल पवार, शेखर लोंढे, हर्षद रणधीर, संतोष उघाडे, शशांक जाधव, ऋषिकेश इंगवले, आकाश काळे, मंथन ननवरे, मुक्तार शेख, मंगेश कावरे, जुनेद बागवान, प्रदीप सुर्वे, गणेश डेरे, रोहन जगताप, राहुल बगाडे, शुभम सोनवणे साहिल सोनवणे आदींनी मेहनत घेतली.

One Comment on “BPL-4 चा भापकर 007 बनला नवा किंग!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *