सावधान! बारामतीत आरटीओच्या कारवाईला सुरुवात

बारामती, 22 ऑगस्टः बारामती शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांसह इतर वाहनांच्या तपासणीला क्षेत्रिय परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून सुरुवात करण्यात आली आहे. बारामती शहरातील भिगवण चौकात आज, 22 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या वाहन तपासणीत एका ओमनी गाडी मालकाला तब्बल 21 हजारांचा दंड मारण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात बेशिस्ट आणि विनापरवाना वाहने चालवणाऱ्यांना सुमारे 4 लाख 53 हजार 745 रुपयांचा दंड आकारला आहे. या कारवाईनंतर शहरातील वाहन चालकांना धडकी भरली आहे.

रासायनिक हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यू, तीन कुत्री जखमी

बारामती शहरातील नेहमी वर्दळ असणाऱ्या भिगवण चौक आणि तीन हत्ती चौकात आरटीओकडून आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईचा भाग म्हणून एका ओमनी वाहनाची तपासणी केली. सदर वाहनात तब्बल 12 प्रवासी बसवून वाहतूक करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच सदर ओमनी गाडीच्या काचांना काळ्या रंगाचा प्लॉस्टिक कागद लावण्यात आला होता. तसेच इतर नियम मोडल्यामुळे सदर ओमनी गाडी मालकाला तब्बल 21 हजार रुपयांचा दंड मारण्यात आला आहे.



सध्या इतर वाहनांवरही  आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई ही आरटीओ वाहन निरीक्षक हेमंतकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *