बारामतीत विवाहितेला लाकडी दांडक्याने मारहाण

बारामती, 23 जानेवारीः बारामती तालुक्यातील सुपे येथे एक विवाहिता नांदण्यासाठी आल्याने तिला आणि तिच्या आईला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना 20 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास घडली आहे. सदर घटनेनंतर सुपे पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी सना शिकलगार (वय 29, रा. आदर्शनगर भोसरी, पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पती परवेज शिकलगार, तय्यब शिकलगार, इम्तियाज शिकलगार, असिफा इशाक शिकलगार, इशाक शिकलगार (सर्व रा. सुपे ता. बारामती) यांच्या विरोधात भादंवी क 143,147,148,149,324,323,504,427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिकृपानगर आठ दिवसांपासून तहानलेलाच!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सना शिकलगार ह्या काही वैयक्तिक कारणाने काही दिवसांपासून माहेरी राहत होत्या. मात्र त्या 20 जानेवारी 2023 रोजी बारामती तालुक्यातील सुपे येथील आपल्या सासरी आई अफसर शेख यांच्या सोबत नांदण्यासाठी गेल्या. मात्र सासरी गेल्यानंतर संशयित आरोपी पती परवेज शिकलगार याने ‘तुझी हिम्मत कशी झाली येथे यायची’ असे म्हणून फिर्यादी सना हिच्या हातातील मोबाईल हिसकावून जमीनीवर आपटून नुकसान केले. तसेच सनाच्या डोक्यात डाव्या बाजूने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर संशयित आरोपी दीर तय्यब शिकलगार आणि इम्तियाज शिकलगार यांनी सना हिच्या दोन्ही पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करू लागले. मारहाणीतून मुलीची सुटका करण्यासाठी आई अफसर शेख या पुढे आल्या मात्र त्यांनाही संशयित आरोपी सासू असिफा शिकलगार आणि सासरे इसाक शिकलगार यांनी हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली.

महसूल खात्याच्या हलगर्जीपणामुळे बारामतीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास

या घटनेनंतर सना शिकलगार आणि आई अफसर शेख यांनी सुपे पोलीस दुरक्षेत्र ओपी खबर नं. 23/2023 येथे फिर्याद दिली. सदर तक्रार वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शेंडगे हे करीत आहे.

One Comment on “बारामतीत विवाहितेला लाकडी दांडक्याने मारहाण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *