हैदराबाद, 24 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिल याला 2022-23 या वर्षातील ‘इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सोहळा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. तर कोरोनाच्या काळानंतर म्हणजेच, 2019 नंतर प्रथमच हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला भारताचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थितीत होते.
https://twitter.com/BCCI/status/1749786945075707993?s=19
गिल सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू!
या पुरस्कार सोहळ्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला 2022-23 या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. शुभमन गिल साठी 2023 हे वर्ष खास ठरले आहे. त्याने या वर्षात एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक झळकावले आहे. 2023 या वर्षात गिलने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत 5 शतके आणि 9 अर्थशतके झळकावली आहेत. सोबतच त्याने गेल्या वर्षात वनडेमध्ये सर्वात जलद 2 हजार धावा करण्याचा विक्रमही केला होता. गिलने 2023 मध्ये एकूण 29 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 63.36 च्या सरासरीने 1 हजार 584 धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळे शुभमन गिलला 2022-23 या वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1749786614686228975?s=19
https://twitter.com/BCCI/status/1749786188960133347?s=19
https://twitter.com/BCCI/status/1749785725867016254?s=19
बुमराह, शमी, आश्विनला मिळाला सन्मान
बीसीसीआयने या सोहळ्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला 2019-20 ह्या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. तसेच फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला 2020-21 या वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबतच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला 2021-22 या वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला.
https://twitter.com/BCCI/status/1749785504843993501?s=19
https://twitter.com/BCCI/status/1749785272659980490?s=19
स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू
याशिवाय ह्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू दीप्ती शर्मा हिला 2022-23 या वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. सोबतच भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला 2020-19 आणि 2021-22 या वर्षांतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला.
https://twitter.com/BCCI/status/1749790205547360522?s=19
रवी शास्त्री यांना जीवनगौरव प्रदान!
यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 2023 या वर्षातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवी शास्त्री यांनी भारताकडून 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच ते भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक देखील होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. सोबतच अनेक प्रतिष्ठित मालिका देखील जिंकल्या होत्या.