बावनकुळेंच्या कॅसिनोतील फोटोमुळे आरोप प्रत्यारोप

मुंबई, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो मधील फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. त्यामुळे सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो मधील फोटो ट्विट करून ते जुगार खेळत असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी

चंद्रकांत बावनकुळे यांचा फोटो शेयर करत संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…” त्यानंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले. “19 नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” संजय राऊत यांच्या या आरोपानंतर चंद्रकांत बावनकुळे यांनी यासंदर्भात त्यांचा एक फोटो ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.

शिवाजी पार्कमधील बाचाबाची प्रकरण; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा

“मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करत बावनकुळे यांना टोला लगावला. “ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊ ला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!” असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

यादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बावनकुळे यांच्यावरील आरोपांचे खंडन करण्यात आले. यावेळी भाजपने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेयर करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ आदित्य ठाकरे यांच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे?” असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

One Comment on “बावनकुळेंच्या कॅसिनोतील फोटोमुळे आरोप प्रत्यारोप”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *