मुंबई, 3 डिसेंबरः महाराष्ट्र शासन वस्तू व सेवाकर विभाग, विशेष राज्यकर आयुक्त यांच्या कार्यालयाकडून कर सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांना राज्यकर निरीक्षक पदावर पदोन्नती संदर्भात 2 डिसेंबर 2022 रोजी आदेश जाहीर केले आहेत. सदर पदोन्नतीचे आदेश विशेष राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मान्यतेने राज्यकर सहआयुक्त (मुख्या-4) महाराष्ट्र राज्य महेश कुलकर्णी यांनी दिले आहेत.
13 जागांसाठी तब्बल 61 इच्छुक रिंगणात!
या आदेशानुसार बारामतीचे सुपुत्र विनीत गजानन सुपेकर यांची राज्यकर निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. या आधी ते कर सहाय्यक पदावर कार्यरत होते. त्यांची नियुक्ती पुण्यातील येरवडा येथील अपर राज्यकर आयुक्त, पुणे क्षेत्र येथे होणार आहे.
पोलिसांकरिता पोस्को कायद्याचे प्रशिक्षण
ही पदोन्नती मिळाल्याबद्दल विनीत सुपेकर यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच योगेंद्र दादा युवा मंच महाराष्ट्र राज्य सदस्य (बारामती) रितेश गायकवाड आणि बुद्धिस्ट स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया(BSFI)चे अध्यक्ष संकोष गायकवाड, तसेच BSFI आणि प्रबुद्ध युवक संघटनाचे सर्व सदस्य यांनी विनीत सुपेकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
One Comment on “बारामतीच्या सुपुत्राची राज्यकर निरीक्षक पदावर पदोन्नती!”